कोणाला साद घालावी माऊली म्हणून?
आपल्या जन्मदात्या आई आणि वडिलांना? ज्यांनी स्वतः च्या मायेच्या उबदार पंखाखाली एक सुरक्षित जीवन देऊन या जगाशी आपली ओळख करून दिली. एक सुजाण आणि कर्तव्यदक्ष नागरिक होण्याच्या दिशेने आपली योग्य ती जडणघडण केली.
की जो युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे त्याला माऊली म्हणावे? जो आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांसाठी एक उर्जास्थान असून भक्त पुंडलिकाच्या मातृ आणि पितृ भक्तीचे माहात्म्य सर्व मनुष्यांना सांगताना मातृ देवो भव पितृ देवो भव ही शिकवण जगाला देत आहे त्याला.
की जगत जननी भवानी मातेला माऊली म्हणावे? जिला ती जगत जननी असूनदेखील निपुत्रिक असण्याचा शाप मिळाला होता एका पौराणिक कथेनुसार कामदेवाची पत्नी रती हिने भगवान शंकर यांच्या तिसऱ्या नेत्रा मुळे भस्म होऊन मृत्युमखी पडलेल्या आपल्या पती कमदेवाच्या वियोगमुळे असा शाप दिला होता. आता हा प्रश्न येतोच ज्या पार्वती मातेला दोन पुत्र आणि एक कन्या आहे ती आणि निपुत्रिक? देवी पार्वती ने कार्तिकेय, श्रीगणेश आणि देवी अशोकसुंदरी यांना स्वतः जन्म नाही दिला. कार्तिकेय मध्ये शंकर पार्वती यांचा अंश आहे पण जन्म मात्र कृतिकानी दिला आहे. सध्याच्या सोप्या भाषेत सांगयचं तर सरोगसी पद्धतीने त्यांचा जन्म झाला. तर श्री विनायका चा जन्म नायका विना (म्हणजेच विना नायक) झालेला आहे म्हणजेच देवी पार्वती यांच्या मळपासून ही कथा तर सर्वश्रुतच आहे. (सध्याच्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी), आणि लहान देवी अशोकसुंदरी राना वनात एकटीच असह्य हिंडताना पाहुन तिच्या बद्दल माया उत्पन्न होऊन देवी पार्वतीनी त्यांना स्वतः बरोबर कैलासावर आणले आणि आपल्या परिवारात स्थान दिले (सध्या च्या काळात याला आपण दत्तक घेणे असे संबोधतो.) आणि अनेक दुष्टांचा सव्हार करून (दुष्ट भावना, विकार आणि विकृती यांचा नाश करून) तिने भूतलावरील तिच्या सर्व लेकरांचे सौरक्षण केले आहे. तर अशी ही जगत जननी साऱ्या जगालाच ही शिकवण देते की आई म्हणजे नुसतीच जन्मदात्री नव्हे तर ती एक उत्कट पण निर्मळ आणि निःस्वार्थी प्रेम भावना आहे जी सदैव आपल्या मुलांना उत्तोत्तम मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवते, त्यांचे रक्षण करते, उत्तम जडण घडण करते.
की जगाला ज्ञानामृताचे पसायदान देऊन जनजागृती करणाऱ्या ज्ञानेश्वरांना माऊली म्हणावे?
ज्यांच्या अस्तित्वाबद्दल जन्माबद्दल प्रश्न निर्माण करून त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ करणाऱ्या लोकांना त्यांनी मनापासून क्षमा केली आणि आपली काहीच चूक नसताना मनाचे मोठे औदार्य दाखवून क्षमा करून सकारात्मकता म्हणजे काय असते याचे मोठे उदाहरणच त्यांनी जगासमोर ठेवले आहे. प्रासादिक निरूपण आणि पसायदाना च्या स्वरूपात लोककल्याण आणि मानवतेची शिकवणं त्यांनी जनमानसात प्रसारित केली आहे.
की लोकसेवा, मानवताधर्म, कर्माचरण, समाजकारण याची शिकवण देणाऱ्या सर्व संत सज्जनांना माऊली म्हणावे?
की संकटसमयी आपली साथ देणाऱ्या प्रत्येकाला माऊली म्हणावे? अशी अगणित यादीच तयार होईल पण कदाचित हा प्रश्न अनुत्तरीत च राहिलं.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक माऊलींची यादी असतेच यामध्ये स्त्री आणि पुरूष असा लिंग भेद असू नये कारण स्त्री असो अथवा पुरूष या पंचमहाभुतिक देहात पंचप्राण सह त्या परमेश्वरानेच ममत्व, प्रिती आणि सारा असाराचा सदविवेक सर्व मनुष्यांना समसमान बहाल केला आहे परंतु त्याचे फळ मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात आपल्या स्वतःच्या कर्माचारणावर अवलंबून ठेवले आहे. मग आपण कोण असा भेद करणारे नाही का?
मा - माझ्यातील सद्गुणाना प्रोत्साहन देणाऱ्या, माझ्या चुका परखड पणे सांगून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या
ऊ - उराशी कवटाळून माझ्या संकटसमयी माझी साथ देणाऱ्या
ली - लीनता, मानवता, माणुसकी, कर्माचरण याची शिकवण देणाऱ्या
माझ्या आयुष्यातील या सर्व माउलींना माझा मनःपूर्वक सादर प्रणाम 🙏
तुम्हां सर्वांच्या शुभ आशिर्वादाने आणि माझ्या छोट्या भावाच्या प्रेरणेमुळे आज प्रथमच हा लेख लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा लेख माझ्या आयुष्यातील प्रत्येक माऊलीला समर्पित 🙏
लेखिका
- सोनल
सुरेश
साखरकर
© सोनल सुरेश
साखरकर
(आवडल्यास शेअर
करतांना
कथेत
कुठलाही
बदल
न
करता
कृपया
मुळ
लेखिकेच्या
नावासहच
शेअर
करा
ही
नम्र
विनंती)
Chan
उत्तर द्याहटवाखूप छान मांडणी केली आहे. पहिलाच लेख आहे असं वाटतं नाही. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा